Search

ONCE UPON A TIME IN DANTEWADA

Updated: 2 days ago


भारतातला सर्वात नक्षल प्रभावित जिल्हा ‘दंतेवाडा’, जिथं ज्ञानसेतु मार्फत जाण्याची संधी व आव्हान आमच्यासमोर होतं. ‘मिडिया’ दररोज आम्हाला स्थानिक परीस्थिच अवलोकन करून जाण्यासंबंधीचा पेच निर्माण करत असे. त्यातच आम्ही दोन मुलं व आमच्या सोबत तिकडे असणार होत्या मुली, पण त्या मुलींची विस्मित करणारी प्रगल्भता व हिंमत प्रखर होती त्याने आम्हालाही बळ आलं.

अखेर कार्यशाळा घेऊन आम्हाला विज्ञान प्रयोग शिकवले.29/11 ला आम्ही हैद्राबादकडे रवाना झालो. आता तेथुन दंतेवाडासाठी जाणारी तेलंगणा परीवहनची दिवसभरातुन एकच बस होती. बस निघाली आणि आम्ही मनाची घालमेल जाणवत होती, एकीकडे भीतीच सावट तर दुसरीकडे पराकोटीची उत्सुकता.. सुकमापर्यंत झोप लागलीच नव्हती. मार्गावरून घनदाट अंधार होता सर्वत्र जंगल होत, मोबाईल तर कधीच निकामी पडला होता. कस असेल? काय होईल? या विवंचनेतच झोप लागली असावी.

सकाळी आम्ही दन्तेवाडाला पोहोचलो. बसने आम्हाला उतरवल बसस्थानक असेल म्हणुन वाटलेलं ! तर तसच होत पण तिथे अधिकृत अस परीवहन कार्यालय देखिल नव्हतं. जिल्हा दर्जाच ते ठिकाण होत पण तस कदापिही भासत नव्हतं. ‘बचपन बनाओ’च्या मनमोहक परीसरात आमची राहण्याची सोय करण्यात आली होती.साधारणपणे 2014 साली आदीवासी भागातल्या शिक्षणाच्या समस्यांना हेरून प्रणीत नामक युवकाने ‘बचपन बनाओ’च बीज रोवलं व आजमितीला त्यांचा ‘सपनों कीं शाला’ उपक्रम चालला आहे. ‘सपनोकी शाला’ हा उपक्रम अत्यंतिक वाखाळण्याजोगा आहे. तिथला अभ्यासक्रम स्थानिक परीस्थिला अनुसरून पर्यावरणाला साजेसा असा बनवला होता. पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्षी ज्ञानावर तिथे भर होता.

आमच्या पहिल्याच शाळेत आमच्याकडुन अपेक्षित व त्यांना साजेस अशी छबी साकारता आली. प्रयोग घेण्यात आले, विविध गमतीजमती चालल्या, गाणी, खेळ अस सर्व चाललेलं. काहीवेळा आमचे हिंदी शब्द मुलांना समजत नसत मग त्यांच्या स्थानिक गोंडी वा हलबी भाषेत शिक्षक त्यांना समजुन सांगत. शिक्षकाच्या भुमीकेत जबाबदारी काळजीपुर्वक हाताळावी लागते. विद्यार्थ्यांशी हितगुज करत असतांना मी प्रश्न विचारला होता के “यहाँपै किसकों DM यातो पुलीसवाला बनना है” लागलीच एक उठला व तोर्यात म्हणाला होता “किसीको नही बनना नहीं तो अंदरवालें मार डालेंगे”,अंदरवाले म्हणजे नक्षलवादी. यावरून तिकडच्या कोवळ्या मनावर नक्षलींचा असलेला आघात जाणवतो.

विलक्षण अस् ‘मुर्गा फाईटला’ आवर्जुन जाण्याचा मोह टाळता आला नाही. यात कोंबड्याच्या पायाला चाकु लावतात, त्यांवर बोली लावली जाते. त्यांच युद्ध रंगते.त्यात एका कोंबड्याला प्राणाला मुकाव लागत. असलं सगळ.

बस्तर भागात अगदी थोड्या दिवसाच्या वास्तव्यात तिथल्या लोकजीवनाशी एकरूप झालो. मितभाशी, मवाळ मर्यादित गरजेमध्ये समाधानी असणारे असे हे लोक ! नक्षलवाद जणु त्यांच्या जीवनातला सर्वसामान्य भाग. तिथलं समाजमन, लोकजीवन मनाला भावणार होत. खरतर तिकडे नक्षलींचा प्रभाव होता पण आम्हाला त्याची झळ पोहोचली नाही.

- राणारूद्रप्रतापसिंह  • YouTube
  • Facebook
  • Instagram

©2020 - Gyan-Setu  |  All rights reserved