top of page
Maghalaya
What our volunteers say
What our volunteers say
Rushikesh Nanaware ( Masters in Developmental Studies )
ज्ञानसेतूच्या माध्यमातून 2018 साली मणिपूर ह्या राज्यात जाण्याची संधी मिळाली. तिथल्या दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधता आला. विज्ञान विषयाची गोडी मुलांमध्ये निर्माण व्हावी व सोप्या भाषेत शालेय विद्यार्थ्यांनी विज्ञान समजून घ्यावं ह्यासाठी वर्ग तिथे घेतले. मुलांनी आवडीने सर्व वर्गात भाग घेतला. आपला देश विविधतेने परिपूर्ण आहे. हिरवेगार डोंगर, कोसळणारे धबधबे, शुद्ध हवा आणि ह्या परिपूर्ण निसर्गाशी नातं सांगणारी माणसं त्यानिमित्ताने जवळून अनुभवता आली. सर्वच बाजुंनी समृद्ध करणारा हा अनुभव होता.
bottom of page